दिंडोरी : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात न घेण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.दिंडोरी ग्रामपालिका कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी झालेल्या मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत धनगरसह इतर कोणत्याही समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार एम. पी. कनोजे यांना निवेदन देण्यात आले, मोर्चा सरपंच छबाबाई वाघ, उपसरपंच शांताराम चारोस्कर, माजी सरपंच गुलाब गांगोडे, आदिवासी समाज सेवा संघाचे अध्यक्ष राम चौरे, बी. एम. बागुल, वैभव महाले आदि सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता. (वार्ताहर)