शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 00:58 IST

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा असून, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरणाबरोबरच कोरोना उपचारांबाबतही या भागात अनेक गैरसमज असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. ते टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून,  त्यासाठी आदिवासींच्या बोलीभाषेचा वापर करून आवाहन केले जात आहे. 

ठळक मुद्देजि.प.ची जागृती मोहीम : सीईओ, कविता राऊतकडून आर्जव

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा असून, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरणाबरोबरच कोरोना उपचारांबाबतही या भागात अनेक गैरसमज असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. ते टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून,  त्यासाठी आदिवासींच्या बोलीभाषेचा वापर करून आवाहन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी आदिवासी भागातील नागरिक केंद्रावर येत नाहीत. काही गावांमध्ये लसीकरणासाठी गेलेल्या पथकाला पिटाळून लावण्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील शिक्षक, डॉक्टरांची मदत घेऊन आदिवासींची मनधरणी केली जात आहे. त्यांच्यात लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज दूर करताना विशेष करून लस घेतल्यानंतर मृत्यू होण्याची असलेली भीती सारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदिवासी जनतेच्या बोलीभाषेचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून लस किती सुरक्षित आहे व आम्हीदेखील लस घेतल्यावर कसे सुरक्षित  आहोत, याचे दृश्य स्वरूपात प्रत्यंतर दिले जात आहे. त्यासाठी डांगी व अहिराणी या दोन्ही भाषेचा वापर केला जात आहे. आदिवासी भागात प्रामुख्याने डांगी भाषेचा प्रभाव अधिक असून, त्यातही गुजरात राज्याला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर अशा अफवा आहेत. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत त्याचबरोबर लसीकरण झालेल्या नागरिक, कोरोना वैद्यकीय उपचार घेतलेल्या नागरिकांचे अनुभव,  शिक्षक रतन चौधरी आदींची लस घेण्याचे आवाहन करणारी चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. n समाजमाध्यमांद्वारे या जनजागृतीपर चित्रफितींची प्रचार प्रसिद्ध केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या सर्व चित्रफिती प्रकाशित करण्यात आल्या असून आदिवासी भागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचे कर्मचारी व नागरिकांनादेखील या चित्रफिती सोप्या पद्धतीने बघता याव्यात यासाठी क्युआर कोड देण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस