शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणशास्त्र विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:07 IST

बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते.

नाशिक : बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आणि एमएड यांसारख्या शिक्षणशास्त्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णत: बदलली असून सध्या बीएड, एमएड झालेले पदवीधरही बेरोजगार असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा कल ओसरला आहे. त्यामुळे राज्यात बीएडच्या उपलब्ध जागांवर प्रवेशासाठीही विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्यात यावर्षी बीएडच्या जवळपास ४४ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून येत नाही. उपलब्ध ४४ हजार जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून केवळ ३७ हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित मानला जात असला तरी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये जवळपास सात हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये बीएडच्या जवळपास १७५० जागा उपलब्ध आहेत, तर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात हा आकडा कमी असण्याची शक्यता असल्याने सीईटीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात एमएडच्याही उपलब्ध २ हजार ६५९ जागांपैकी काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे नाशिकमध्ये एमएडच्या जवळपास १०० जागा उपलब्ध असून, जिल्ह्यातून केवळ ४९ विद्यार्थ्यांनीच सीईटीसाठी अर्ज केले आहेत. उर्वरित जागांवर बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येण्याची शक्यता खूपच कमी असल्याने यापैकी ३० ते ४० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.८ व ९ जूनला सीईटीबीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह ३७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण एक हजार अर्जांपेक्षाही कमी आहे. दरम्यान, प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्या माध्यमातून महाविद्यालयांचीही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध संस्थांच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी