शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

वनमंत्र्यांनी लावले होते झाड, चार वर्षांनंतर जागा ओसाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:38 IST

सुदर्शन सारडा ओझर (नाशिक) : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधीमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत ...

ठळक मुद्देग्राऊंड रिॲलिटी; वृक्षलागवड मोहिमेचे ओझर येथील वास्तव

सुदर्शन सारडाओझर (नाशिक) : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधीमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली असतानाच तीन वर्षांपूर्वी ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वहस्ते लागवड केलेला वृक्षच जळून गेल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.जेथे वनमंत्र्यांनी लावलेल्या वृक्षाचेच नीटसे संवर्धन झालेले नाही, तेथे अन्य लागवडीची काय कथा, असा प्रश्न त्यानमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. फडणवीस सरकारच्या काळात ह्यएकच लक्ष्य, ३३ कोटी वृक्षह्ण या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी ओझर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते जुलै महिन्यात २०१७ मध्ये वृक्ष लागवडीचा दिमाखात प्रारंभ झाला होता. त्यानंतर ओझर येथीलच किनो थिएटरला कार्यक्रमही झाला होता. १ ते ७ जुलै या सप्ताहात चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. कमी वेळेत जास्त कार्यक्रम, ही भूमिका घेत वनमंत्र्यांनी विमानाने जाऊन राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ४ जुलैला मुनगंटीवार नाशिकला ओझर विमानतळ येथे उतरणार असल्याने जवळच्या जागेतच वृक्षलागवडीचे नियोजन चांदवडच्या वनाधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एचएएलमधील गणपती मंदिराजवळील जागा वृक्षलागवडीसाठी निश्चित केली होती. मात्र, चार वर्षांनंतर आता या जागेत ओसाड माळरान दिसत आहे. मुनगंटीवार यांनी वृक्षलागवड केली तेथे केवळ एक खड्डा उरला आहे. वृक्षासोबत लावण्यात आलेली वनमंत्र्यांच्या नावाची पाटीही गायब झालेली आहे.लागवड अन‌् फोटोसेशनवृक्षलागवड मोहीम ही बऱ्याचदा केवळ फोटोसेशन पुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आणि जिल्ह्यातील वृक्षलागवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

टॅग्स :Ozarओझरforest departmentवनविभाग