एसटीच्या दांडेलशाहीपुढे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:48 PM2019-11-19T20:48:34+5:302019-11-19T20:49:10+5:30

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे. अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

Travelers flock to the dandelion of ST | एसटीच्या दांडेलशाहीपुढे प्रवासी वैतागले

मालेगाव-ओझर-नाशिक असा स्पष्ट उल्लेख असलेली बस आज पर्यंत बसस्थानकात आलेलीच नाही.

Next
ठळक मुद्देओझर : अनेक गाड्या बस स्थानकात न येताच होतात पसार

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे.
अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
प्रत्येक एसटीच्या तिकिट मशीनवर ओझर असा उल्लेख ठळक असताना व ओझर येथे बस स्थानक असून देखील दोन तीन आगाराच्या बसेस वगळता चालक, वाहकांनी महामार्गावर थांबा थाटल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत आहे. असाच अनुभव नाशिक ते मालेगाव बस (एमएच ११/९३१८) मध्ये अनुभवला गेला असून फलकावर ठळकपणे ओझर असा उल्लेख असताना बस सर्रासपणे बाहेरून जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
सामान्य प्रवाश्यांचे नेमके काय बिघडले आहेत ते न समजण्यापलीकडे गेल्याने सर्वच एसटी प्रवासी वैतागल्याचे चित्र असून रीतसर ओझरचे तिकीट देऊन सटाणा, मालेगाव, साक्र ी आगाराचे काही चालक वाहक सीबीएसला नकार देत असताना बळजबरीने प्रवासी बसलाच तर ताकीद देऊन भर महामार्गवर प्रवाश्यांना उतरवून सुसाट निघून जात आहे. यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
तिकिटावर जेथे जात आहे ते आल्यास तो थांबा आहे असे नियम असून आज पर्यंत शेकडो प्रवाश्यांना या अजब नियमांचा सामना करावा लागत आहे. यामुळे सटाणा, साक्र ी, नंदुरबार, मालेगाव, शिरपूर आदी ठिकाणच्या नियमति बसेसना ओझर रीतसर थांबा आहे परंतु प्रवाशाला बसतानाच ओझरला बाहेर उतरावे लागेल असा दम काही वाहक देतात तर अनेक चालक गावात येण्याचा कंटाळा करत असतात.
सदर समस्या गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष घालावे जेणेकरून उत्पन्न वाढ, सतत तोट्यात चालणाऱ्या एसटीला काही प्रमाणात हातभार लाग
विनावाहक बसेस वगळता प्रत्येक मशीनवर ओझर, पिंपळगाव थांब्याचा उल्लेख असताना चालकाला सदर स्थानकात बस घेऊन जाणे अनिवार्य आहे. याने एसटीचे उत्पन्न वाढणार असून नियमानुसार न चालणाºया चालक, वाहकांवर कडक कार्यवाही करण्याचे धोरण सुरू केले आहे. प्रवाश्यांना देखील विनंती आहे की तिकिटावर थांबा असताना चालक वाहकाने बस स्थानकात घेऊन न गेल्यास आपली तक्र ार बस क्र मांकसह द्यावी त्यानंतर कारवाइ नक्की होईल.
- नितीन मैन्ड
विभाग नियंत्रक, नाशिक.
 

Web Title: Travelers flock to the dandelion of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.