शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पर्यटकांनी साधली दिवाळीच्या सुटीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:19 IST

दिवाळीच्या सुटीची संधी साधून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकण आणि केरळ म्हणजेच समुद्रकिनाºयाला प्राधान्य दिले आहे. महाबळेश्वर, माथेरान यांसारख्या महागड्या ठिकाणांच्या तुलनेत स्थानिक पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्यांमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमणे पसंत केले.

नाशिक : दिवाळीच्या सुटीची संधी साधून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकण आणि केरळ म्हणजेच समुद्रकिनाºयाला प्राधान्य दिले आहे. महाबळेश्वर, माथेरान यांसारख्या महागड्या ठिकाणांच्या तुलनेत स्थानिक पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्यांमध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमणे पसंत केले.  दिवाळीच्या सुटीत पर्यटकांची कोकणला सर्वाधिक पसंती मिळण्यामागे तेथील धार्मिक स्थळे, निसर्गरम्यता, समुद्रकिनारा, गड व किल्ले आदी पर्यटनस्थळांचा अनोखा मेळ आणि परवडणारी सहल हे प्रमुख कारण आहे. यंदाच्या दिवाळीत केरळपेक्षाही कोकणात पर्यटनासाठी जाणाºयांची संख्या अधिक आहे. दिवाळीची सुटी म्हणजे पर्यटनाचा योग हे समीकरण गेल्या काही वर्षांत चांगलेच रूजले आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना, शांत व रमणीय परिसरात भ्रमंती करण्याची उच्चभ्रूंपुरती मर्यादित राहिलेली पर्यटनाची मौज मध्यम व उच्च मध्यमवर्गामध्येही रूजली आहे. त्यामुळे मध्यम व उच्च मध्यम वर्गातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध यात्रा कंपन्यांनी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या सवलतींचा पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात लाभ उठवला. दिवाळीच्या सुटीत उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा अशा नेहमीच्या पर्यटनस्थळांनाही भेटी देणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परराज्यात जाणाºया पर्यटकांनी केरळला प्रथम पसंती दिली असून, दिवाळीपूर्वीच अनेक कुटुंबांनी सहलींचे प्लॅनिंग केले होते. नाशिकहून सर्वाधिक पर्यटक कोकणात तारकर्ली, मालवण, दिवे आगर, सावंतवाडी, दापोली, गणपती पुळे या भागात पर्यटनासाठी गेले असून, पर्यटकांनी मराठवाड्यातील धार्मिक स्थळे व वेरूळ, अजिंठासारख्या लेणींनाही पसंती दिल्याचे विविध पर्यटन कंपन्यांनी सांगितले.परदेशवारीची उत्सुकतादिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनासाठी नाशिककरांनी कोकण किनारपट्टीला अधिक पसंती दिली. देशातील पर्यटनस्थळांमध्ये सर्वाधिक पसंती केरळला मिळाली असून, विदेशात सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, श्रीलंका या देशांमध्येही जाण्यासाठी नाशिककरांनी उत्सुकता दाखवली. दिवाळीचे दोन दिवस उत्सव आटोपून पर्यटक देशाटनासाठी बाहेर पडले. धार्मिक पर्यटनासाठी गुजरातसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी वेगवेगळ्या राज्यांतही नाशिकचे पर्यटक बाहेर पडले असून धार्मिक पर्यटनाकडेही नाशिककरांचा कल वाढला आहे.पर्यटकांना नाशिकचे आकर्षणस्थानिक पर्यटक परराज्यासह राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यास मग्न असताना परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर भागातून नाशिकमध्ये येणाºया पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सप्तशृंगी गड आदी ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.