शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकहून केवळ धुळ्यासाठीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:02 IST

राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररोज धुळेसाठी चार ते पाच फेऱ्या केल्या जात असून, असाच प्रकार जिल्ह्यातील तालुकांतर्गंत केला जात आहे. मात्र एसटीतून खासगी प्रवाशांना ‘नो एंट्री’ आहे. 

ठळक मुद्देप्रवासी सेवा ठप्प : फक्त कर्मचाऱ्यांची वाहतूक

नाशिक : राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररोज धुळेसाठी चार ते पाच फेऱ्या केल्या जात असून, असाच प्रकार जिल्ह्यातील तालुकांतर्गंत केला जात आहे. मात्र एसटीतून खासगी प्रवाशांना ‘नो एंट्री’ आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करून त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, शासनाच्या निर्देशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीमार्फत वाहतूक करण्याचे आदेश असल्याने त्यानुसार एसटीच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून, फक्त धुळे येथे शासकीय नोकरीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने दररोज सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत धुळेसाठी गाड्या सोडल्या जात आहेत. प्रत्येक फेरीसाठी पंधरा ते वीस प्रवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. असाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, येवला, मनमाड, मालेगाव, इगतपुरी या तालुक्यातून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. यात प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, आराेग्य कर्मचारी, पोलीस, पाणीपुरवठा या विभागातीलच कर्मचारी असून, प्रवास करू इच्छिणाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच एसटीत प्रवेश दिला जात आहे.सेवेतून तोटाचअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची एसटीतून वाहतूक केली जात असली तरी, एसटीच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी असावेत असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु काही तालुक्यातून अवघे चार ते पाच प्रवासी ये-जा करीत असल्याने एसटी महामंडळाला तोटाच सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप