शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उलगडला चंद्रापर्यंतचा प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:11 IST

अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण नोंद ठरली.

नाशिक : अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण नोंद ठरली. अमेरिकेसह जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यानंतर एक वेगळीच दिशा मिळाली. पृथ्वीच्या पल्ल्याड मानवाचे हे प्रथम पाऊल होते. या रोमांचकारी मोहिमेच्या आठवणींना उजाळा देत अपोलो-११ यानाची अद्भुत स्वारी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी जणू प्रत्यक्षच अनुभवली.निमित्त होते, मानवाच्या चंद्रावरील पहिल्या पदस्पर्शाच्या सुवर्णजयंतीचे औचित्यावर रविवारी (दि.२१) नॅशनल स्पेस सोसायटीची नाशिक शाखा व मविप्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सीएमसीएस महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपोलो-११ यानाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झालेले अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञांनी आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण व प्रेझेंटेन्शनद्वारे या मोहिमेवर प्रकाशझोत टाकला. मोहिमेच्या विविध बाजू, त्यासाठी करण्यात आलेली विशेष तयारी याविषयी माहिती देत मानवाच्या प्रथम चंद्रस्वारीच्या प्रवासाचे पट उलगडून सांगितले.१० जुलै १९६९ साली यानाचे कमांडर नील आर्मस्ट्रॉँग, कमांड मॉड्यूल पायलट एडविन बज एल्ड्रिन व लुनार मॉड्यूल पायलट मायक ल कॉलिन्स यांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. या अपोलो-११ यानाच्या मिशनसाठी करण्यात आलेल्या तयारीपासून आर्मस्ट्रॉँगचे चंद्रावरील पहिले पाऊलपर्यंतचा प्रवास उपस्थिताना थक्क करून गेला. यावेळी व्यासपीठावर मविप्रचे शिक्षणधिकारी एस. के. शिंदे, सोसायटीचे अविनाश शिरोडे, सचिव प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर उपस्थित होते.शास्त्रज्ञांनी साधला संवादव्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाइन अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. अ‍ॅमी बेरा, रॉन जॉन्स, पिटर कॉक, स्टिफन अ‍ॅकर्ली यांच्याशी अविनाश शिरोडे यांनी संवाद साधत अपोलो-११ यान मोहिमेचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. अपोलो-११ची चंद्रस्वारी, चंद्रावर पाऊल ठेवणारे आर्मस्ट्रॉँग आदी पैलूंवर यावेळी शास्त्रज्ञांनी थेट प्रकाश टाकला.पाच वर्षांनी पुन्हा गाठणार चंद्र४अपोलो-११ यान या मोहिमेत नील आर्मस्टॉँगसह अन्य शास्त्रज्ञ २ तास ३२ मिनिटे चंद्रावर थांबले होते. यासाठी अब्जावधी रु पयांचा खर्च करण्यात आला होता. ‘नासा’कडून २०२४ साली पुन्हा ‘बॅक टू स्टे आॅन मून’ ही मोहीम राबविली जाणार आहे. यानिमित्ताने पाच वर्षांनी पुन्हा मानव चंद्र गाठणार असल्याचीही माहिती यावेळी अविनाश शिरोडे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकNASAनासा