शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:33 IST

नाशिक : नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक

नाशिक येथे आयोजित विभागीय विकास आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. समवेत कृषिमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव अजेय मेहता.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक : नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठकीअंतर्गत गुरुवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विकासकामांची आढावा बैठक पार पडली. धुळे जिल्ह्याच्या बैठकप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार श्रीमती मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार डॉ. फारु क शहा, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. महापालिका आयुक्त शेख आदिंसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १२०० गावांचा पेसामध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठ दिवसांत केंद्र शासनास सादर करण्यात येईल. साक्री येथील मोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या दुरु स्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील. जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे प्रगतिपथावर आहे तसेच जी कामे सुरू झाली आहे ती पूर्ण करण्यात येतील. धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मालेगाव रोडवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. निम्न पांझरा, अक्कलपाडा धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची अडचण लक्षात घेता हे धरण भरल्यानंतर त्याखालील धरण भरून जलसाठा वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच धुळे शहरात १०० खाटांचे रुग्णालय मंजूर असून, त्यासाठी लागणारा कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमआरआय मशीन खरेदीस तसेच रिक्त पदे भरण्याची मागणी यावेळी केली.आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्याचे निर्देशशेतकऱ्यांचा पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा सुरू असून, हा प्रश्न तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाºयांनी याबाबत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे व शिरपूर हे महामार्गावरील महत्त्वाचे शहर असल्याने येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय