शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी , कृषिपूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरू राहणार ; दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:04 IST

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्देकृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र व वाहतूक बंदी नाहीकृषिपूरक उद्योगांशी संबंधित सेवा सुरळीत सुरू राहणार

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र व वाहतूक यासंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही. त्यामुळे कृषी व कृषिपूरक उद्योगांशी संबंधित सर्व सेवा सुरळीतपणे चालू राहणार असून शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी गर्दी न करता निर्भय राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. नाशिकच्याजिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दादा भुसे म्हणाले, प्रत्येकाने स्वत:ची आणि देशाची काळजी घेतली पाहिजे. सद्यस्थितीत घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. नागरिकांनी शासन प्रशासनास समन्वय व सहकार्य केल्यास या कोरोनाच्या संकटाचा सक्षमपणे सामना करू शकतो. जिल्ह्यात कलम १४४ लावल्यानंतर शेतीसंबंधित बियाणे व खते व्यवसाय, शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांची वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही यासंदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार आरटीओने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आॅनलाइन परवाने व स्टिकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देशभर अशा प्रकारची वाहतूक अत्यावश्यक कामांसाठी सुरू असून कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरू राहतील. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. दरम्यान, काही द्राक्षे निर्यात झाली असली तरी काही बागा काढणीला आहेत. यासंदर्भात द्राक्षे बागायतदार महासंघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिल्या असून स्थानिक पातळीवर द्र्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जनतेला अन्नधान्य, भाजीपाला, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून,  घाबरून न जाता कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नका, असे आवाहन भुसे यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार अनिल कदम, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकagricultureशेतीTrafficवाहतूक कोंडीcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस