शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकाने रोखली अवैध मद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:34 IST

द्वारका परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ला मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी द्वारकेवर सापळा रचला. यावेळी संशयित नरेश पेरुमल नागपाल (रा. देवळाली कॅम्प) हा राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून नेत असताना आढळून आला. पथकाने वाहन रोखून त्यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त केला.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग : विदेशी मद्यसाठ्यासह चार वाहने जप्त

नाशिक : द्वारका परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ला मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी द्वारकेवर सापळा रचला. यावेळी संशयित नरेश पेरुमल नागपाल (रा. देवळाली कॅम्प) हा राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून नेत असताना आढळून आला. पथकाने वाहन रोखून त्यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त केला.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, भरारी पथकाने नरेश नागपाल यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता देवळाली कॅम्प परिसरात राहणाºया किरपाल फत्तेचंद नागपाल याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार भरारी पथकाने देवळाली कॅम्प गाठून किरपालच्या राहत्या घरी छापा मारला. त्याच्या चारचाकी व दुचाकीमधून पथकाने सुमारे १ लिटरच्या ११० मद्याच्या (स्कॉच) भरलेल्या बाटल्या हस्तगत केल्या. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी व दोन दुचाकीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे किरपाल याने हे विदेशी मद्य आंतरराष्टÑीय विमानतळावरून कर चुकवेगिरी करून देवळाली कॅम्प परिसरात आणले असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत दिली आहे. त्यानुसार पथकाकडून या मद्याची पडताळणी सुरू असून दिलेल्या माहितीत कितपत सत्त्यता आहे, हे पडताळून बघितले जात आहे. विदेशी मद्य बनावटदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्या दिशेनेही तपास करीत आहेत. या कारवाईत निरीक्षक मधुकर राख, प्रवीण मंडलिक, वीरेंद्र वाघ, अरुण सुत्रावे, सुनील पाटील आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक