वणी : कत्तलीसाठी ७ गुरे घेऊन जाणारी पिकअप पोलिसांनी तिसगाव फाट्यावर पकडली असुन ५१ हजाराची गुरे व ४ लाख रुपये किमतीची पिकअप असा एकुण ४ लाख ५१ हजाराचा ऐवज जप्त केला असुन फरार वाहन चालकाचा शोध घेतआहेत.याबाबत वणी पोलीसांकडुन प्राप्त माहीती अशी की, वणी-खेडगाव रस्त्यावरुन कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होतअसल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील राजपुत यांना मिळाली. त्यांनी या मार्गावर सापळा लावला व गस्तीपथक कार्यान्वित केले. या दरम्यान पिकअप (एम एच ५०-५१६२) या रस्त्यावरुन मार्गक्रमण करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास येताच पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाला न जुमानता ही पिकअप चालकाने पुढे दामटली.वाहनाचा अनियंत्रित वेग असल्याने तिसगाव फाट्यालगतच्या परिसरात उभ्या असलेल्या टेंपोला पिकअपने धडक दिली.त्यामुळे पाठलाग करणारे पथक त्या ठिकाणी पोहचले. पोलिसांना पाहताच पिकअप वाहन तेथेच सोडुन चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले व तपासणी केली,असता निर्दयपणे गुरांचे पाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत ही गुरे दिसली व कत्तलीसाठी या गुरांची वाहतुक केली जात असल्याची बाब निदर्शनास आली. या गुरांना बाहेर काढुन त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था पोलिसांनी केली असून अधिक तपास पथक करीत आहे.
कत्तलीसाठी ७ गुरांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:15 IST
वणी : कत्तलीसाठी ७ गुरे घेऊन जाणारी पिकअप पोलिसांनी तिसगाव फाट्यावर पकडली असुन ५१ हजाराची गुरे व ४ लाख रुपये किमतीची पिकअप असा एकुण ४ लाख ५१ हजाराचा ऐवज जप्त केला असुन फरार वाहन चालकाचा शोध घेतआहेत.
कत्तलीसाठी ७ गुरांची वाहतूक
ठळक मुद्देवाहनासह ४ लाख ५१ हजारांचा ऐवज जप्त