शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या निमित्ताने ट्रांझिट आधारित विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:22 IST

देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे.

नाशिक : देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे. प्रीमियम आकारून विकासकांना ज्यादा एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे मेट्रोलादेखील आर्थिक आधार मिळणार आहे. महामेट्रोच्या सल्लागारांनी त्याचा अभ्यास सुरू केला असून, मंगळवारी (दि.२४) महापालिकेसदेखील भेट दिली.केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने नाशिक शहरात महामेट्रोचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नाशिकची मर्यादित लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती याचा विचार करून नाशिक शहरासाठी खास टायर बेस्ड मेट्रो बसचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. २१०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या महामेट्रोच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. त्यासाठी गंगापूर ते नाशिकरोड दरम्याना ३२ किलोमीटरची उन्नत मार्गिका असणार आहे. त्याच्या कोरीडोरमधील पाचशे मीटर क्षेत्रात सध्या ट्रांझिट बेस डेव्हलपमेंट करण्याची महामेट्रोची योजना आहे. कोणतीही शहरी सार्वजनिक वाहतूक तोट्यातच असते. त्यामुळे कोरीडोरपासून पाचशे मीटर अंतरातील क्षेत्राचा विचार केला जाणार आहे आणि तोच महत्त्वाचा भाग असणार आहे. या भागात कॉम्पॅक्ट सिटी उभारण्याची योजना आहे. या क्षेत्रात विकासासाठी ज्यादा एफएसआय देऊन त्या बदल्यात महामेट्रो प्रीमियम आकारेल. त्यामुळे महामेट्रोचा तोटा कमी होऊ शकेल.महामेट्रोच्या या योजनेत पाचशे मीटर राहणीमान योग्य शहर असावे, अशी योजना आहे. त्यानुसार याठिकाणी नियोजन बद्ध विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार घरे आणि सायकल ट्रॅक असे सर्व काही कमीत कमी प्रदूषण असणारे असेल आणि त्याच ठिकाणी अनेक सुविधा असतील.मेट्रोच्या सेवेसाठी कमीत कमी वेळात आणि खासगी वाहनांचा वापर न करता जावे यावे लागणे हा या मागाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.काय आहे टीओडी?सध्या जगभरात टीओडीची चर्चा आहे. कॉम्पॅक्ट सिटी उभारून ती राहणीयोग्य करणे ही संकल्पना आहे. कॉम्पॅक्ट सिटीमुळे नागरिकांना फारसा प्रवास करावा लागत नाही आणि करायचा म्हटलाच तर नॉन मोटराइज्ड व्हेईकलचा अधिकाधिक वापर असतो.कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नव्हे तोट्यातच असते. परंतु ती चालवणे ही गरज असते. त्यामुळे कोरीडोरचा विकास करताना ज्यादा एफएसआय विकून प्रीमियमच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची योजना आहे.४या क्षेत्रात विकासासाठी ज्यादा एफएसआय देऊन त्या बदल्यात महामेट्रो प्रीमियम आकारेल. त्यामुळे महामेट्रोचा तोटा कमी होऊ शकेल.

टॅग्स :Metroमेट्रोNashikनाशिक