शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शहरातील पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:08 IST

पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक विजय खरात यांची पोलीस आयुक्तालयात कांगणे यांच्या रिक्त जागेवर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक विजय खरात यांची पोलीस आयुक्तालयात कांगणे यांच्या रिक्त जागेवर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच नाशिक ग्रामीणच्या मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची नागपूर शहरात उपायुक्तपदी बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील उपसंचालक नंदकुमार ठाकूर यांची बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तसेच पदोन्नतीने जयश्री देसाई यांची पोलीस अकादमी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी सोलापूरचे सहायक पोलीस आयुक्त रमेश चोपडे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोलापूर ग्रामीणवरून आलेले चंद्रकांत खांडवी यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.आगामी विधानसभाआगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाकडून सहायक आयुक्त, उपअधीक्षक, उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस