शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत तीन वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:55 IST

महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांचे निकष : खातेप्रमुखांकडून मागविली माहिती

नाशिक : महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात जानेवारी महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.महापालिकेच्या आस्थापनांवरील विविध अधिकारी आणि कर्मचाºयांच्या गेल्यावर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत बदल्या झाल्या होत्या. अनेकांना या बदल्या सोयीपेक्षा गैरसोयीच्या अधिक वाटत असल्याने अशा अधिकारी आणि कर्मचाºयांनी आता बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. मुंढे यांच्या अगोदरही बदल्या झाल्यानंतर सोयीच्या ठिकाणी बदली झालेली नाही त्यांनीदेखील बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत यासंदर्भात राजकीय नेते आणि नगरसेवकदेखील प्रशासनाकडे प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपांना मनाई असली तरी दबावतंत्र मात्र सर्रास सुरू आहे.निकषांवर आधारित होणार बदल्याआयुक्त गमे यांनी आता बदलीसाठी नियमानुसार धोरण ठरवले असून, ज्या कर्मचाºयांना एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत तेथून त्यांची बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाºयांची उचलबांगडी अटळ दिसत आहे, दुसरीकडे बदली करताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचाºयाने त्या विभागात यापूर्वी काम केले नसेल अशाच ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. या निकषावर आधारित बदल्यांचे प्रस्ताव जानेवारी अखेरपर्यंत आयुक्तांनी सादर करण्यास सांगितले आहेत.विठ्ठल मंचतर्फे संगीत भजन रजनीनाशिक : सायखेडा येथील श्री विठ्ठल संगीत मंच यांच्या वतीने संगीत भजन रजनी या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित रमाकांत गायकवाड व त्यांचे पिताश्री भजनसम्राट सूर्यकांत गायकवाड या पितापुत्रांनी सांप्रदायिक नियमाप्रमाणे जय जय रामकृष्णहरी ते जय जय विठ्ठल रखुमाई भजन (पंचपती) सादर करून सर्व रसिकश्रोत्यांना भक्तिरसाने मंत्रमुग्ध केले. विविध संतांच्या रचना वेगवेगळ्या रागांमधून सादर केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी