शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल कार्यक्रमातून शिक्षकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:52 IST

कळवण : कोरोनाच्या संकटामुळे काही शाळांमध्ये आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू केले असले तरी बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना सहाय्य म्हणून रोटरी इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट अध्यापनासाठी डिजिटल कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून सातशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे क्लबचे सेक्रेटरी नीलेश भामरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्मार्ट अध्यापन : व्हिडिओ, व्हॉट्सअ‍ॅॅपद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कोरोनाच्या संकटामुळे काही शाळांमध्ये आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू केले असले तरी बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना सहाय्य म्हणून रोटरी इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट अध्यापनासाठी डिजिटल कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून सातशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे क्लबचे सेक्रेटरी नीलेश भामरे यांनी सांगितले.रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने रोटरी इंडिया साक्षरता अभियान या कार्यक्रमातून पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून शिक्षकांना तंत्रज्ञानातील पंधरा कौशल्य शिकवण्यात आले. त्यासाठी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळांतील शिक्षकांचे सात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून दररोज तीन कौशल्याचे व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न पाठवले.या कौशल्यावर पुढील दिवशी प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ, नवीन कौशल्यांचा व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न या स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. यात प्रामुख्याने शिक्षकांना मोबाइल लॅपटॉपवर हॉट स्पॉट जोडणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसे करावे, व्हॉइस रेकॉर्ड, गुगल ड्राइव्ह, स्कॅनर, यू-ट्यूब चॅनल निर्मिती, गुगल डॉक्युमेंट, गुगल क्लासरूम, झूम अ‍ॅप, गुगल मॅप टेलिग्राम या सर्वांच्या वापराबाबत संबंधित व्हिडिओ पाठविले गेले व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहाव्या दिवशी सराव करण्यात येऊन सातव्या दिवशी एक ५० प्रश्नांची आॅनलाइन टेस्ट घेतली गेली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना लगेच सहभागाचे इ- प्रमाणपत्र ई-मेलवर पाठविण्यात आले. उपक्रम राबविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, रोटरी नाशिकचे जिल्हा प्रकल्प समन्वयक सलीम बटाडा, कळवण रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश मुसळे या प्रकल्पाचे संचालक नीलेश भामरे, विषयतज्ज्ञ अभिनंदन धात्रक, उपप्रांतपाल जितेंद्र कापडणे, विलास शिरोरे, रवींद्र पगार, रोटरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.रोटरी इंडिया साक्षरता अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांना स्मार्ट अध्यापनातील पंधरा कौशल्य शिकायला मिळाले. लॉकडाऊनच्या काळात या डिजिटल कौशल्यामुळे तालुक्यातील शिक्षक नक्कीच अपग्रेड झाले आहेत. आॅनलाइन अध्यापनासाठी शिक्षकांना या कौशल्याचा उपयोग होणार आहे.- हेमंत बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कळवण

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण