शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

विद्यार्थी स्वयंसेवकांची पोलिसांकडून रंगीत तालीम

By admin | Updated: August 6, 2015 00:35 IST

कुंभमेळा : स्नानासाठी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाचे धडे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाची पहिली पर्वणी अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन व नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची आखणी करण्यात येत असून त्याअंतर्गत बुधवारी (दि.५) दुपारी रोकडोबा व्यायामशाळेसमोर गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन स्वयंसेवकांची रंगीत तालीम घेण्यात आली. शाहीस्नानासाठी भाविकांचा जनसागर गोदाकाठी लोटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस, महापालिका प्रशासनाकडून मागील चार महिन्यांपासून जय्यत तयारी केली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेपासून तर आरोग्यापर्यंत सर्वच प्रकारची दक्षता व उपाययोजना करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने अन्य मोठ्या शहरांमधून सिंहस्थासाठी अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले आहे. याचबरोबर नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाचे जवान, विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक संघटनांचे कार्यक र्ते यांचीही स्वयंसेवक म्हणून पोलीस प्रशासन मदत घेणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे निहाय स्वयंसेवक गठीत करण्यात आलेआहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीनशे महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये बीवायके, आरवायके, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, भोसला महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या स्वयंसेवकांच्या रंगीत तालीम सत्राचा ‘श्री गणेशा’ बुधवारी रोकडोबा पटांगणावर करण्यात आला. बीवायके, विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांची रंगीत तालीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश काळे, रमेश यादव यांनी घेतली. यावेळी त्यांना शाहीस्नानाच्या वेळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण कसे करावे, गोदापात्रात आंघोळीसाठी जास्त वेळ थांबणाऱ्या भाविकांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे, भाविकांचा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी दोरखंडाचा वापर कसा करावयाचा, काही भाविकांना प्रथमोपचाराची गरज भासल्यास रुग्णवाहिकेपर्यंत कसे पोहचवायचे आदि बारकावे समजावून सांगण्यात आले. तसेच त्या सर्व बाबींची प्रात्यक्षिके स्वयंसेवकांकडून करून घेण्यात आली.(प्रतिनिधी)