शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द न झाल्यास प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:43 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याची मागणी स मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची मागणीमेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशनचा इशारा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याची मागणी स मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासंदर्भात २२ व २५ मे रोजी मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच राज्यपाल यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू व परीक्षा नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले असल्याचा दावा मेडिकल स्टूडंट वेल्फेअर असोसिएशन व वैद्यकीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाची  वाढती परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे योग्य नाही. लॉकडॉऊन मुळे विद्यार्थी मूळ गावी गेले आहेत. त्याचप्रमाणे काही शहरात पुन्हा नव्यानं लॉकडाऊन घोषित केला आहे. अशा वेळेस विद्यार्थी एका शहरातून दुसºया शहरात येण्यासाठी एसटी व रेल्वे पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितत परीक्षेला येणाºया विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक भीती आहे. तसेच शरात येणाºया विद्यार्थ्यांच्या होस्टेल मेसच्या समस्या आहेत. तरीही आरोग्य विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. अशा काळात सर्व वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्याचे नमूद करीत  विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय शाखेच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. परंतु विद्यापीठाला पत्रव्यवहार करूनही आरोग्य विद्यापीठाने प्रतिसाद ना देता उलट विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत करून करोना झाल्यास एक लाख रुपये व विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये असेकोवीड सुरक्षाकवच जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थी संगटनेने केला आहे. त्याचप्रमाणे दिनांक ५ व १२ जूनला संघटनेकडून सर्व वैद्यकीय शाखेच्या परीक्षा रद्द न झाल्यास महाराष्ट्रातील पदवी व पदव्युत्तर शाखेचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर जातील असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सर्व वैद्यकीय शाखेच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखेचे पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोणत्याही क्षणी संपावर जातील असा इशारा मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य