शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:03 IST

सीतागुंफारोडवरील शिवाजीचौक परिसरात शुक्रवारी  (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याची घटना घडली़ टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्यानंतर परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

पंचवटी : सीतागुंफारोडवरील शिवाजीचौक परिसरात शुक्रवारी  (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याची घटना घडली़ टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्यानंतर परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.  शिवाजी चौक परिसरातील रस्त्यालगत काही नागरिकांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपल्या चारचाकी उभ्या केलेल्या होत्या़ पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या़ त्यामध्ये मारुती-८०० (एम एच १५ एएस १९३०), मारुती ओम्नी (एमएच १५ एएस ६३३८), मारुती अल्टो कार (एमएच १५ डीएम ७४५४) व अन्य एक अशा चार वाहनांचा समावेश आहे. त्यानंतर या परिसरातील मुठाळ यांच्या घरावरही दगडफेक केली़  शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात काही मद्यपी तसेच टवाळखोरांचा वावर असून, शिवाजी चौकात दहशत माजविण्याचा उद्देशानेच टवाळखोरांनी उभ्या वाहनांच्या काचा फोडून दगडफेक केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे़ सकाळी वाहनांच्या काचा फोडल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ या घटनेनंतर वाहनांच्या मालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.अंतर्गत वादातून घडली घटनाकाही महिन्यांपूर्वी पाथरवट लेन परिसरातील दोन गटांत जबर हाणामारी होऊन त्यांनी परिसरातील घरांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केल्याची घटना घडली होती़ या संशयितांनी अंतर्गत वाद व वर्चस्वाच्या कारणावरून या परिसरात दहशत माजविल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. दरम्यान, या परिसरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकात पुन्हा या प्रकारची घटना घडल्याने संशयित हे स्थानिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा