शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाळे येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:41 IST

मालेगाव तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.छायाबाई पुंडलिक कोते व गोकुळ नानाजी कोते दोन्ही रा. नाळे यांनी पोलिसात परस्परविरोधात फिर्याद दिली. छायाबाई कोते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिने व तिच्या सोबतच्या साक्षीदारांनी गोकुळ कोते यांच्या घरासमोरून तुम्ही माझे पती पुंडलिक कोते यांना मारहाण का केली अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून गोकुळ कोते याने काठीने फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. त्याच्या साथीदारांनी दगडाने फिर्यादीच्या डोक्यावर मारून दुखापत केली तर अन्य चौघांनी फिर्यादीच्या मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ कोते याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छायाबाई कोते व तिच्या सोबतच्या चार जणांनी फिर्यादीच्या घरासमोर येवून आम्ही आमच्या म्हशी चरण्यासाठी सोडल्यानंतर तू आडवा का येतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्याच्या सोबतच्या दोघांनी फिर्यादीस लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. छायाबाईने दगड उचलून फिर्यादीचे वडील व पत्नी यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले.दोन जणांनी फिर्यादीची मुलगी व मुलगा यांना शिवीगाळ व मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक तांदळे व बच्छाव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMalegaonमालेगांव