शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाच्या ‘वर्दी’ला हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:38 IST

रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त्यांच्या ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधक्काबुक्की : रिक्षाचालक-मालकाचा प्रताप

नाशिक : पाचही बोटे सारखी नसतात, हे खरे असले तरी एक व्यक्ती चुकीची वागली तर संपूर्ण क्षेत्र बदनाम होते, हेदेखील सत्य आहे. रिक्षाचालकांच्या बाबतीत असे नेहमीच घडत आले आहे. रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त्यांच्या ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.घडलेला सविस्तर प्रकार असा, रिक्षाचालक संशयित गजानन प्रकाश दुधाडे (२१, रा. श्रमिकनगर) हा त्याची रिक्षा (एम.एच. १५, ई.एच ०५८६) घेऊन शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास ‘फ्रंट सीट’ बसवून सीबीएस चौकात आला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याची रिक्षा क र्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार द्वारिका परशुराम यादव (५०) यांनी थांबविली. त्याचा राग चालक दुधाडे याच्या शेजारी बसलेला रिक्षामालक स्वप्नील सुरेश गुरव याला आला. त्याने यादव यांच्याशी अरेरावी केली. त्यांच्या वर्दीची कॉलर धरत जोरात हिसका दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, हा वादविवाद सुरू असताना यादव यांच्या मदतीला कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड यांनी धाव घेतली असता गुरव याने त्यांनाही न जुमानता दुधाडे यानेही वादात सहभागी होत गायकवाड यांच्या वर्दीवरील नावाची पाटी हिसका देत तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरव व दुधाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी