नांदगाव : गुरूवारी आठवडे बाजाराच्या दिवशी फळ विक्रेत्यांनी आपले बस्तान शाकंबरी पुलावरील पादचारी रस्त्यावरच थाटल्याने पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. दर गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी हा प्रकार होत असल्याने रहदारीचीदेखील दिवसभर कोंडी होत असते. यासाठी वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे. शहरातील रेल्वे स्टेशन ते नांदगाव महाविद्यालयापर्यंतचा रस्ता अति वर्दळीचा असून, रस्त्यावरची वाहतूक कोंडी असो की रस्त्यावरील खड्डे हे नेहमीच चर्चेत असतात. आंतरराज्य वाहतूक, औरंगाबाद, पानेवाडी, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव येथे जाणारी व येणारी वाहतूक या मार्गाने होत असते. शहरातील रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंप, बँक, मंगल कार्यालये, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, हॉस्पिटल तसेच मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आदी ठिकाणे आहेत. वाहतुकीची कोंडी दूर करण्याची मागणी होत आहे.
आठवडे बाजारात रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:48 IST