शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच वाहने उभी  केल्याने  नाशिकरोडला वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:39 IST

रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

नाशिकरोड : रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.  रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड मळा रस्त्यावर दुतर्फा व्यावसायिक व रहिवासी संकुले आहेत. काही व्यावसायिक संकुलला पार्किंगची जागाच सोडण्यात आली नाही. तर काही संकुलाची पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. व्यावसायिक रेजिमेंटल प्लाझा इमारत, गायकवाड मळा रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, क्लासेस, दवाखाने असून रहिवासी राहात असल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रेजिमेंटल प्लाझाकडून गायकवाड मळा रस्त्याने दत्तमंदिररोड व प्रतीक आर्केड मार्गे नाशिक-पुणे महामार्गावर जाता येते. बिटको ते देवळालीगावपर्यंतच्या महात्मा गांधी रोडवरून दत्तमंदिररोड व तेथून इतरत्र जाण्यासाठी गायकवाड मळा, मुक्तिधाम-सोमाणी उद्यान रस्त्याचा स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात वापर करतात. वाढलेली लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत छोटे पडतात. त्यात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनांना रस्त्यावर उभे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गायकवाड मळा रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्याच्या पुढे मोकळ्या जागेवर रस्त्यापेक्षा उंच सीमेंटचा कोबा अथवा पेव्हर ब्लॉक लावलेले आहेत. त्यामुळे दुकानांत येणारे गिºहाईक ही आपली दुचाकी, चारचाकी गाडी रस्त्यावरच लावतात. अगोदरच रस्ता छोटा असून दुतर्फा रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होत आहे. सोमाणी उद्यान रस्त्यावर दुतर्फा असलेले विक्रेत्यांचे अतिक्रमण, पार्किंगची अपुरी जागा यामुळे तेथेदेखील दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असते. दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याने मनपा शहर व वाहतूक शाखेने त्या ठिकाणी व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर आदींची बैठक घेऊन सर्वसंमतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.आयुक्तांची घोषणा हवेततीन महिन्यांपूर्वी दत्तमंदिररोड येथील मैदानावर झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमामध्ये नागरिकांनी सोमाणी उद्यान व गायकवाड मळा रस्त्यावर अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची तक्रार केली होती. तसेच सोमाणी उद्यान व गायकवाड मळा रोड (दोन्ही वेगवेगळ्या बाजूने) वन-वे केल्यास वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी सूचना केली होती. यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहर वाहतूक शाखेला तत्काळ प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती घोषणा हवेतच विरली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस