शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:18 IST

नांदूरशिंगोटे : पुण्याकडून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाºया वाहनांची सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपास चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. ...

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

नांदूरशिंगोटे : पुण्याकडून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाºया वाहनांची सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपास चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. पुण्यातील होम कॉरण्टाइन रुग्ण बाहेर पडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत कर्मचारी पथक याठिकाणी कार्यान्वित आहे. परदेशातून आलेले, बाहेर जिल्ह्यातील प्रवासी यांची नोंद घेतली जात आहे. वावी पोलिसांचे पथक याठिकाणी कामात सहकार्य करीत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाºया प्रत्येक वाहनाची तपासणी करून कोरोना संशयित आणि क्वॉरण्टाइन रुग्णांना रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सोमवारपासून (दि. २३) तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपासजवळ सकाळी ९ वाजता पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाहनांची तपासणी केली जात होती. आरोग्य विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग, पोलीस अशा चार विभागाचे प्रत्येकी १ याप्रमाणे चार कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. सदर पथक हे २४ तास कार्यान्वित राहणार असून, येणाºया जाणाºया वाहनांची तपासणी करणार आहेत. येणाºया वाहनातील प्रवाशांचे पथकामार्फत तपमान, ब्लडप्रेशर, प्लसरेट आदींची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत चेक नाक्यावर ५५० वाहनांतून तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणीही होत आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस