शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये पारंपरिक पूजन ; भाविकांना दर्शन दुर्लभ : घरोघरी बेलपत्र अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:49 IST

नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवलिंगाचे पूजन केले.

ठळक मुद्देश्रावणी सोमवारनिमित्त शिवालयांमध्ये पारंपारिक पूजाश्री कपालेश्वर, श्री सोमेश्वर मंदिरांचे भाविकांनी घेतले कळस दर्शन

नाशिक : श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण असे महत्त्व असून, प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात दुग्धाभिषेक, बेलपत्राभिषेक करून शिवमूठ वाहून शिवभक्त श्रद्धापूर्वक पूजन करतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या महामारीमुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या दोन श्रावणी सोमवार प्रमाणेच तिसºया सोमवारीही भाविकांना शिवदर्शन दुर्लभच झाल्याचे दिसून आले. अनेक भाविकांनी घरातच शिवप्रतिमेला अथवा जवळील शिवालयात बेलपत्र अर्पण करून भक्तिभावाने भगवान शिवशंकर महादेवांची पूजा केली.  शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवलिंगाचे पूजन केले. दरवर्षी श्रावण महिना आणि सोमवारी शिवालयांमध्ये बम बम भोले, हर हर महादेवचा गजर होतो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद असून, केवळ पुजारी मंडळींकडून कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेत डिस्टन्सिंगचे पालन करीत दररोजचे पूजन अभिषेक केले जात असून, श्रावणाच्या तिसºया सोमवारीही शहरात हीच परिस्थिती पाहायला मिळाली. कोरोनाबाबत शासनाच्या आदेशाचे पालन करीत मंदिरात केवळ पारंपरिक ४ ते ५ पुरोहित व विश्वस्त मंडळाच्या उपस्थित फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शिवशंकरांचे भक्तिभावाने पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यामुळे भाविकांनी श्री कपालेश्वर आणि श्री सोमेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भगवान शिवाकडे कोरोनामुक्तीची प्रार्थना केली. दरम्यान, गोदाघाटावर बाणेश्वर आणि मुक्तेश्वर येथील शिवलिंग मोकळे असल्याने तेथे अभिषेक व पूजन करण्यासाठी गर्दी झाली होती.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकShravan Specialश्रावण स्पेशल