सटाणा : शहरातील दैनंदिन भाजीबाजार व अन्य ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने जाचक करवसुली होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील संतप्त व्यापारी व शेतकºयांनी आज मंगळवारी (दि.२) पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.खासगी ठेकेदार नेमणूक नकरता नगरपालिकेने माफक दराने कर वसुली करावी या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे व अधिकाºयांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात अन्यायकारक वसुली न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर व्यापारी व शेतकºयांनी आंदोलन मागे घेण्यात आले.नगरपालिकेकडून दैनंदिन भाजीपाला बाजारात व्यापारी व शेतकºयांकडून कर वसुली केली जाते. प्रतिचौरस मीटर हिशोबाने करण्यात येणाºया कर वसुलीला व्यापारी व शेतकºयांनी जोरदार विरोध केला आहे. यापूर्वी ठेकेदारी पद्धतीने ही वसुली केली जात होती. त्यामुळे ती अन्यायकारक असल्यामुळे ती बंद करण्यात आली. नगरपालिकेने त्यानुसार ठेकेदारी पद्धत बंदकरून स्वत: कर वसुली करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार सोमवारपासून (दि. १) कर वसुलीची सुरुवात करण्यात आली. भाजीबाजार येथून व इतर ठिकाणी कर वसुली पथक साठरुपयांपासून तीनशेऐंशी रु पये एवढा जाचक कर वसूल करत होते. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी वर्ग व शेतकºयांकडून तीव्र विरोध केला. आज मंगळवारी सर्व व्यापारी व शेतकºयांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून पालिकेत ठिय्या दिला.यावेळी नगरसेवक दीपक पाकळे, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, पंकज सोनवणे, मंगेश भामरे, दीपक नंदाळे, तुषार गाडेकर, संजय पाकवार, विनोद नंदाळे, जितेंद्र सरदार, संतोष मोरे, मोठाभाऊ सूर्यवंशी, गणेश खैरनार, अण्णा मोरे, हेमंत नेरकर, राजू शिवदे, समाधान अहिरे, संदीप शिवदे, अनिस शेख, शेरा शेख, शब्बीर अत्तार, काळू मोरे, प्रकाश मोरे, रेखा शिवदे, सुमन गिते, सुमन गरुडकर, पोपटराव सौंदाणकर, गणेश मोरे, संगीत बच्छाव, सुमनबाई गोंधळी, लताबाई देवरे, शोभा पवार, शकुंतला पवार, मनीष रामोळे, सुशीलाबाई वारडे, तोल्याबाई पवार, सुनंदा मोहन, यशोदा सावकार, बायजाबाई पवार, आक्काबाई अहिर, मोनाबाई पवार, शांताबाई पवार, मीनाबाई गायकवाड, लीलाबाई सोनजे, विठाबाई पवार, मैनाबाई देवरे, अनिता पवार आदींसह भाजीपाला विक्रेते व शेतकरी उपस्थित होते.कैफियत मांडली...करवसुलीच्या बदल्यात पालिका आम्हाला कुठलीही सुविधा देत नाही, असे असताना मोठ्या प्रमाणात कर वसुली का केली जाते, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. नगराध्यक्ष व अधिकाºयांसमोर याबाबत कैफियत मांडली असताना सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यात आला. छोटे व्यावसायिक व हातगाडी व्यापाºयांकडून वीस रु पये व मोठ्या व्यावसायिकांकडून चाळीस रुपये असा सरसकट कर वसूल करण्यात येणार आहे, असे झालेल्या चर्चेत ठरविण्यात आले.
सटाण्यात व्यापारी, शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:22 IST
सटाणा : शहरातील दैनंदिन भाजीबाजार व अन्य ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने जाचक करवसुली होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील संतप्त व्यापारी व शेतकºयांनी आज मंगळवारी (दि.२) पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
सटाण्यात व्यापारी, शेतकऱ्यांचा ठिय्या
ठळक मुद्देनगरपालिकेवर मोर्चा : जाचक कर वसुलीला विरोध; प्रशासन धारेवर, सुविधांचा अभाव