शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

भर पावसात व्यापाऱ्यांनी केले आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:38 IST

तीन महिन्यांपासून फोडून ठेवलेल्या मेन रोडच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या परिसरातील कामकाज अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये उतरुन आंदोलन केले. तसेच कामाला त्वरीत गती देऊन काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक : तीन महिन्यांपासून फोडून ठेवलेल्या मेन रोडच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या परिसरातील कामकाज अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये उतरुन आंदोलन केले. तसेच कामाला त्वरीत गती देऊन काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

स्मार्ट सिटी कंपनीकडून गावठाण विकासअंतर्गत रस्ते खोदून खालील भागातून पाईपलाईन, भुयारी गटार आणि सर्व्हीस लाईनसाठी डक्ट टाकण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मूळात कामाला प्रारंभच उशीरा झाला. त्यात खड्डे खोदून झाल्यानंतरही कामाला गती देण्यात आली नाही. तर पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर गत महिन्यापासून काम जवळपास ठप्पच झाले आहे. त्यामुळे एकीकडे जो थोडाफार व्यवसाय होऊ शकतो, त्यालादेखील या खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. या परिसरात ट्रॅफीक जामचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. तसेच ड्रेनेज लाईन फुटल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तर खोदकाम करुन ठेवलेल्या भागातील काही जुन्या इमारतींच्या खालील माती खाली धसू लागल्याने त्या नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बुधवारी एकत्र येऊन आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. यावेळी उपस्थित नागरिकांनी मनपा आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी बुक सेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवार, विजय सोमवंशी, अरविंद सोमवंशी, नीलेश कोठारी, सागर मगर, आनंद भट्टड, अशोक करंजकर, जितेंद्र गजभिये तसेच परिसरातील व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन