शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या कांदा खरेदीला व्यापाऱ्यांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:35 IST

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरुवारी (दि. ३) नाफेडच्यावतीने अधिकृत एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक ...

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरुवारी (दि. ३) नाफेडच्यावतीने अधिकृत एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेने कांदा लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेतला. त्यामुळे कांदा लिलाव बंद पडले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मनमानी कारभाराचा निषेध केला. नाफेडने कांदा खरेदी केल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्यानेच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडण्याची चाल खेळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.कांदा महागला तर देशातील नागरिकांना योग्य भावात तो उपलब्ध करून देता यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेडमार्फत कांदा खरेदी गेल्या पाच-सहा वर्षांपासून केली जात आहे. यापूर्वी नाफेडच्यावतीने लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघाला एजन्सी देण्यात आलेली होती. आता ही एजन्सी इफकोच्या संचालक साधना जाधव यांच्या विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेला मिळाली आहे. त्यानुसार बुधवार (दि. २) पासून संस्थेने विंचूर येथे कांदा खरेदीला सुरुवातही केली. परंतु, नाफेडमार्फत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याने या संस्थेने लासलगाव येथूनही कांदा खरेदीसाठी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार गुरुवारी (दि. ३) सकाळी लासलगाव बाजार समितीत १०५७ वाहनांतील कांद्याचा लिलाव झालेला असतानाच कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने श्रीमती साधना जाधव यांनी दोन ट्रॅक्टर्स नाफेडकरिता कांदा खरेदीची बोली लावली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव अर्धवट सोडून तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे बाजार समितीतील लिलाव बंद पडले. सकाळी कांद्याला ८०० ते २१७० व सरासरी १८१५ रुपये भाव जाहीर झाले होते. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत व्यापाऱ्यांसह प्रशासनावर टीका केली. कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेस लासलगाव येथील व्यापारी अनुज्ञप्ती असूनही व्यापाऱ्यांनी हा विरोध केल्याने व्यापाऱ्यांकडून हे अडवणुकीचे धोरण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.कोट....आमच्या संस्थेकडे कांदा खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून अधिकृत परवाना आहे. शिवाय बाजार समितीचा परवाना देखील आहे. नाफेडने खरेदी केल्यास बाजारभाव वाढतील, या भीतीने तथाकथित व्यापारी लिलाव सोडून गेले. शासनाने अधिकृत परवानगी दिलेली असतानाही केवळ शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळू नयेत यासाठी लिलाव बंद पाडण्याचे हे षड्‌यंत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. या मनमानीबद्दल शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.- साधना जाधव, अध्यक्ष, कृषी साधना संस्था

टॅग्स :Nashikनाशिक