पंचवटी : पावसाळा सुरू होऊन दमदार हजेरी न लावलेल्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा फटका गंगाघाट परिसरात व्यवसाय करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला. गोदावरीला पाणी सोडल्याने अनेकांच्या टपऱ्या व हातगाड्या पाण्यात राहिल्या तर काहींनी सुरक्षितता म्हणून बुधवारी दुपारी
पाऊस उघडताच सकाळी आपल्या टपऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले होते.
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परिसरात विविध व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांनी आपल्या मालेगाव स्टॅन्ड उतार तसेच सरदार चौक, मालवीय चौक परिसरातील रस्त्यालगत उभ्या
कराव्या लागल्या. ज्यांच्या टपऱ्या नदीपात्रालगत आहेत त्यांनी
टपऱ्यांना दोरखंड बांधून ठेवले होते तर गोदावरीच्या पुरामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुराच्या पाण्यात टपऱ्या सापडल्याने अनेक व्यावसायिकांच्या टपऱ्या पाण्यात भिजून नुकसान झाले आहे तर काही जणांच्या हातगाड्या पाण्यात वाहून गेल्याचे परिसरात व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांनी सांगितले. पुरामुळे व्यावसायिकांनी टपऱ्या तसेच हातगाड्या सुरक्षित स्थळी म्हणून रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या होत्या.