इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:28 PM2018-03-22T23:28:47+5:302018-03-22T23:28:47+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी शेतकºयांना इगतपुरी कृषी विभागाकडून पाच शेतकºयांना ट्रॅक्टरच्या चाव्या देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Tractor allocation to tribal farmers in eastern part of Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

Next

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी शेतकºयांना इगतपुरी कृषी विभागाकडून पाच शेतकºयांना ट्रॅक्टरच्या चाव्या देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी इगतपुरी उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०१७-१८ नुसार सदर शेतकºयांनी त्यांच्या पसंतीनुसार बँकेकडून कर्ज प्रकरण करून सदर ट्रॅक्टर घेतले आहेत. या कृषी विभागाने प्रत्येक लाभार्थीस एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान दिले आहे. यामध्ये रतन विठ्ठल बांबळे, पोपट किसन बांबळे, मारुती काशीराम बांबळे, गणपत रामजी बांबळे, लालमन दगडू भांडकोळी या पाच शेतकºयांना तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे, कृषी पर्यवेक्षक डी.एस. थोरात, संगीता जाधव, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र परदेशी, सावळीराम कदम, नंदू जाधव यांच्या हस्ते ट्रॅक्टर देण्यात आले. पन्नास टक्के अनुदान देऊन कमा गोविंद निगळे यांना रोटर देण्यात आले. दि. २८ मार्चपर्यंत प्रस्ताव दिल्यास रोटर देण्यात येतील, असे शेवाळे यांनी सांगितले. यावेळी सोमनाथ जाधव, सचिव जगन घोडे, गंगाराम जावळे, ललित मडके, बांबळे, भीमराव साबळे, राम शिंदे, तुकाराम नांगरे, अशोक बांबळे आदी उपस्थित होते. यांच्या कामाविषयी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम भक्तराज जटायू फार्मास प्रोड्यूसर कंपनी टाकेद येथे घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन बांबळे आणि जगन घोडे यांनी केले.

Web Title: Tractor allocation to tribal farmers in eastern part of Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी