शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

टीपी स्कीमला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: November 24, 2015 23:35 IST

स्मार्ट सिटी अभियान : आयुक्तांसमवेत शेतकऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत हरित क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने शहरातील नांदूर-मानूर, नाशिक शिवार तसेच मखमलाबाद परिसरातील शेतकऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या दालनात झाल्या. आयुक्तांनी शेतकऱ्यांसमोर टीपी स्कीमसंदर्भात सादरीकरण केले परंतु शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सदर स्कीमला विरोध दर्शविला आहे. स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत नाशिक महापालिकेला हरित क्षेत्र विकसित करणे, पुनर्विकास अथवा रेट्रोफिटिंग या तीन पर्यायांचा विचार करायचा आहे. रेट्रोफिटिंग पर्याय अंतर्गत महापालिकेने जुने नाशिक व पंचवटी परिसराचा विचार सुरू केला आहे, तर हरित क्षेत्र अंतर्गत मिनी स्मार्ट शहर उभे करण्यासाठी महापालिकेला सुमारे २५० ते ५०० एकर क्षेत्राची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी नांदूर-मानूर परिसर, नाशिक शिवार आणि मखमलाबाद परिसरात टीपी स्कीम राबविता येईल काय, याची चाचपणी महापालिकेमार्फत केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच सदर परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन आयुक्तांच्या दालनात करण्यात आले होते. प्रारंभी, नाशिक शिवार व मखमलाबाद परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट सिटी अभियान नेमके काय आहे, अभियान अंतर्गत महापालिका कोणते पर्याय विकसित करणार आहे, टीपी स्कीम राबविल्यास शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा पुरविल्या जातील, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सदर योजना राबविल्यास त्यांना कोणते फायदे होेतील, याची माहिती दिली. टीपी स्कीम राबविल्यास ५० टक्के जागा महापालिका घेणार असून उर्वरित ५० टक्के जागा शेतकऱ्यांकडे राहणार आहे. टीपी स्कीम अंतर्गत सदर जागांमध्ये रस्ते, वीज, पाणी आदि मूलभूत सुविधा पुरविल्या जातील.