शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळाचा विकास म्हणजे शहराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:21 IST

वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देगणेश देशमुख : काळाराम मंदिर नूतनीकरणाचा शुभारंभ

श्री काळाराम नूतनीकरणाचा शुभारंभ करताना जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख. समवेत बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, महापौर रंजना भानसी, दिनकर पाटील, मधुकर कड, पुष्पा दीदी आदी.पंचवटी : वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले.आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून पर्यटन विभाग निधी अंतर्गत श्री काळाराम मंदिर सुशोभिकरण तसेच लेझर शोच्या कामाचे भूमिपूजन, रथ उभा करण्यासाठी शेड बांधणे, कपालेश्वर मंदिर विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी होत्या. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, विजय साने, नरसिंहदास, पुष्पादीदी, दिनकर पाटील, तुळशीराम गुट्टे, महंत रामसनेहीदास, महंत भक्तिचरण, नगरसेवक गुरमित बग्गा, पोलीस निरीक्षक मधुकर कड आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना देशमुख यांनी सांगितले की, नाशिकला काळाराम मंदिरात येणाºया भक्तांसाठी कायमस्वरूपी अन्नछत्र तसेच भक्त निवास उभारण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. भक्तांना चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठी संस्थान प्रयत्नशील असल्याचे ते शेवटी म्हणाले.आमदार सानप यांनी शहराच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी होत असल्याने खºया अर्थाने विकासकामांची गंगा शहरात आणल्याचे सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक जगदीश पाटील, कमलेश बोडके, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, हेमंत शेट्टी, पुंडलिक खोडे, शांता हिरे, प्रियंका माने, पूनम मोगरे, विमल पाटील, सरिता सोनवणे, नंदिनी बोडके उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर