येवला : पैठणी विणकर कारागिरांना आपल्या हक्काचे केंद्र असावे म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून पैठणी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. या केंद्रास महाराष्ट्र राज्याचे पयर्टन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी भेट दिली.येथील वेगवेगळ्या पैठणी साड्यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. येथील सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन सहायक संचालक आशुतोष राठोड यांनी यावेळी दिले. या प्रसंगी येवला पैठणी पर्यटन केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पैठणी क्लस्टरचे कार्यकारी संचालक प्रविण पहिलवान, विनोद बाकळे, संजय विधाते, सुरेश कुंभारे, सुनिल भावसार, दत्ता मुंगीकर, राकेश कुंभारे उपस्थित होते.
पैठणी केंद्रास पर्यटन महामंडळाच्या संचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:51 IST
येवला : पैठणी विणकर कारागिरांना आपल्या हक्काचे केंद्र असावे म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून पैठणी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. या केंद्रास महाराष्ट्र राज्याचे पयर्टन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी भेट दिली.
पैठणी केंद्रास पर्यटन महामंडळाच्या संचालकांची भेट
ठळक मुद्देवेगवेगळ्या पैठणी साड्यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली