पर्यटन बेतले तरुणाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:25+5:302021-06-23T04:11:25+5:30

सिडको परिसरातील उत्तमनगर, उपेंद्रनगर भागातील सतरा ते अठरा युवक दुचाकीने पावसाळी पर्यटनाकरिता नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार, मोखाडा भागात गेले होते. ...

Tourism bets on the life of a young man | पर्यटन बेतले तरुणाच्या जीवावर

पर्यटन बेतले तरुणाच्या जीवावर

Next

सिडको परिसरातील उत्तमनगर, उपेंद्रनगर भागातील सतरा ते अठरा युवक दुचाकीने पावसाळी पर्यटनाकरिता नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार, मोखाडा भागात गेले होते. मोखाडा येथील एका बंधाऱ्यालगत फिरत असताना उत्तमनगर येथील ऋषिकेष सोनवणे या युवकाचा पाय घसरल्याने तोल जाऊन तो बंधाऱ्यात कोसळला. बंधारा हा पाण्याने तुडुंब भरलेला आणि तितकाच खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे गटांगळ्या खात नाकातोंडात पाणी गेल्याने तो बुडून मृत्युमुखी पडला. येथील स्थानिक आदिवासी रहिवाशांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने शोधाशोध करून मृतदेह बंधाऱ्यातून ऋषिकेशचा मृतदेह बाहेर काढला. मयत ऋषिकेष याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

--इन्फो--

सोनवणे कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा

ऋषिकेष हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला भजन-कीर्तनाची आवड होती. भजनादरम्यान तो तबलावादक म्हणून साथसंगत करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. उत्तमनगर परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये त्याचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

===Photopath===

220621\22nsk_47_22062021_13.jpg

===Caption===

ऋषीकेश

Web Title: Tourism bets on the life of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.