नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२९) रात्री उशिरापर्यंत ५५ तर नाशिक शहरात २६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा आता १ हजार १०८वरून १ हजार १६३वर पोहचला आहे तर नाशिक शहराचा आकडा १५२ वरून १७८ वर पोेहचला. शुक्रवारी शहरात वडाळा चौफुली येथील व्हिनस सोसायटीत सर्वाधिक ७ तर, जुन्या नाशकात ६ रुग्ण मिळून आले. एकूणच दाट लोकवस्तीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने मिळून येत असल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढील पेच आता वाढत चालला आहे.शुक्रवारी नाशिक शहरात पंचवटीतील राहुलवाडी भागात राहणारी ३९ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली तर अंबडलिंक रोडवरील ४९वर्षीय पुरूषाचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तसेच जुन्या नाशकातील कथडा भागात एका ५०वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित आढळून आली. तसेच याच भागातील अजमेरी चौक, नाईकवाडी पुरा येथे २१ व २५ वर्षाच्या युवकासह ४६ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने आता जुन्या नाशकातील रुग्णसंख्या १३ वर पोहचली आहे. तसेच वडाळा शिवारातील वडाळा चौफुलीजवळील व्हिनस सोसायटीत राहणाºया एकाच कुटुंबातील ३० वर्षीय महिला, ६ व ७ वर्षाचे मुले, १२ वर्षाची मुलगी, ३१ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महिला आणि ६५ वर्षीय महिलेचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच दत्तमंदीर नाशिकरोड येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलाही कोरोनाबाधित आढळली. यासह लेखानगरमध्येही एक कोरोनाग्रस्त रू ग्ण आढळून आला.
शहर एकूण : १७८ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १ हजार १६३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:01 IST
एकूणच दाट लोकवस्तीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने मिळून येत असल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढील पेच आता वाढत चालला आहे.
शहर एकूण : १७८ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १ हजार १६३
ठळक मुद्देशहराचा आकडा १५२ वरून १७८ वर वडाळा चौफुली येथील व्हिनस सोसायटीत ७ रुग्ण जुन्या नाशकात ६ रुग्ण