शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पालिका शाळांना अव्वल दर्जाचे वेध

By admin | Updated: May 22, 2014 22:18 IST

शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि अन्य प्रकल्पांच्या आधारे राबविण्यात येत असलेल्या माझी समृद्ध शाळा उपक्रमात ..

नाशिक : शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि अन्य प्रकल्पांच्या आधारे राबविण्यात येत असलेल्या माझी समृद्ध शाळा उपक्रमात १२७ पैकी अव्वल (अ-१) दर्जाची एकही शाळा समाविष्ट नाही. अ-२ मध्ये मात्र १३ शाळा आहेत. त्यामुळे आता या शाळांना वरिष्ठ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण मंडळाने तयारी केली असून, सर्व केंद्रप्रमुखांकडून शाळांमधील भौतिक सुविधांच्या उणिवांविषयी अहवाल मागविण्यात आला आहे.शाळांमध्ये सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शैक्षणिक सोयींवरच शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझी समृद्ध शाळा प्रकल्प राबविण्यात येतो. विविध निकषांच्या आधारे शाळांचे परीक्षण करून तीनशे गुणांपैकी व्यवस्था बघून गुणदान केले जाते आणि या गुणांच्या आधारे श्रेणी घोषित केली जाते. भौतिक आणि शैक्षणिक सुविधांमध्ये शाळा इमारत, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, फर्निचर, बाग, ग्रंथालय अशा एकूण २५ बाबींचा समावेश असून, त्यासाठी ८६ गुण आहेत. लोकसहभागाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघ आणि पोषण आहार समितीसह सहा मुद्दे आहेत. गुणवत्ता विकासाअंतर्गत शैक्षणिक संधी, मुलींचे शिक्षण, विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांचे प्रवेश असे एकूण सहा मुद्दे आणि ३३ गुण आहेत. अ-१ हा दर्जा मिळवण्यासाठी २७१ ते ३00 गुण (९१ ते १00 टक्के) मिळवण्याची गरज असते. परंतु महापालिकेच्या १२७ शाळांपैकी एकही शाळा इतके गुण मिळवू शकलेली नाही. अ-२ दर्जासाठी २४१ ते २७0 गुण (८१ ते ९0 टक्के) आवश्यक असतात. त्यात मनपाच्या १३ शाळा आहेत. ब-१ या दर्जासाठी २११ ते २४0 गुण (७१ ते ८0 टक्के) असणे आवश्यक आहे. त्यात पालिकेच्या ४३ शाळा आहेत. अशाच प्रकारे क-१ गटात सात, क-२ गटात चार शाळा आहेत. मात्र ड या दर्जात एकही शाळा समाविष्ट नाही. या शाळांना वरिष्ठ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्र समन्वयक आणि मुख्याध्यापकांना कोणत्या शाळेत कोणत्या सुविधा नाहीत किंवा अन्य कोणत्या त्रुटी आहेत याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तो आल्यानंतर त्रुटींचा वारंवार आढावा घेऊन शाळा वरिष्ठ श्रेणीत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)