शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्या मविप्रची सहावी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:52 IST

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी ही स्पर्धा ६ जानेवारीला होणार नियमित वेळेच्या काही वेळ आधीच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शुक्रवारी (दि.४) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देतयारी पूर्ण : तीन हजार धावपटूंचा सहभाग

नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यावर्षी ही स्पर्धा ६ जानेवारीला होणार नियमित वेळेच्या काही वेळ आधीच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शुक्रवारी (दि.४) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.नीलिमा पवार यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा प्रवास सांगताना मॅरेथॉन तयारी पूर्ण झाली असून, स्पर्धेचा धावनमार्ग, रिफ्रेशमेंट व स्पंजिंग पॉर्इंट,वैद्यकीय सुविधा, स्पर्धेसाठी असलेले गट, खेळाडूंची निवासाची, भोजनाची व्यवस्था याविषयी माहिती दिली. या स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून, स्पर्धेसाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना तसेच महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांची मान्यता मिळालेली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी.कृष्णन व महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी हे निरीक्षक म्हणून काम पाहतील, असे नियोजन समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, मविप्र मॅरेथॉन २०१९च्या स्मृतिचिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, डी. डी. काजळे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ.मीनाक्षी गवळी आदी उपस्थित होते.ललिता बाबर दाखवणार हिरवा झेंडामॅरेथॉन स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन हजार धावपटूंनी रजिस्ट्रेशन केलेले असून, यावर्षी मागील स्पर्धेची रेकॉर्ड ब्रेक होऊन नवीन विक्रमाची नोंद होईल, अशी आशा आयोजन समितीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेची सुरुवात ही रिओ आॅलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर यांच्या व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.रविवारी वाहतूकमार्गात बदलमराठा विद्या प्रसारक समाजातर्फे गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक ते धोंडेगाव या मार्गावर रविवारी (दि़६) मविप्र मॅरेथॉन-२०१९ होणार आहे़ या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रविवारी या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे़४गंगापूररोडवरील आयुक्तालय हद्द ते मॅरेथॉन चौकापर्यंतचा मार्ग रविवारी पहाटे ५ ते दुपारी १२ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे़ या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही गंगापूररोडवरील रस्तादुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने (अशोकस्तंभ ते आयुक्तालय हद्द) या मार्गावर सुरू राहणार आहे़

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉन