शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:17 IST

वणी : द्राक्ष उत्पादनातील असमतोल, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, निसर्गाचा लहरीपणा व इतर अडचणी लक्षात घेता भोपळ्याच्या उत्पादनाकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. द्राक्षबागांमध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उत्पादकांनी शोधला आहे. दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, विविध जातीच्या द्राक्षाची लागवड करण्यात अग्रभागी असणारा उत्पादक आता भोपळ्याचे आंतरपीक घेत आहे.

ठळक मुद्देभोपळ्याला मागणी वाढलीदिंडोरी, निफाड व कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भोपळ्याचे उत्पादन

वणी : द्राक्ष उत्पादनातील असमतोल, खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, निसर्गाचा लहरीपणा व इतर अडचणी लक्षात घेता भोपळ्याच्या उत्पादनाकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. द्राक्षबागांमध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उत्पादकांनी शोधला आहे.दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असून, विविध जातीच्या द्राक्षाची लागवड करण्यात अग्रभागी असणारा उत्पादक आता भोपळ्याचे आंतरपीक घेत आहे. माळे चंडिकापूर अंबानेर, मावडी वणी व तळेगाव या भागामध्ये भोपळा लागवडीस अग्रक्र म दिला जातो आहे. पूर्वी वरद जातीच्या भोपळ्याचे उत्पादन घेतले जात असे; मात्र आता निर्मल ४८ या जातीच्या भोपळ्याचे उत्पादन घेण्याकडे उत्पादकांचा कल वाढल्याची माहिती उत्पादक टिनू देशमुख यांनी दिली.भोपळ्याचे उत्पादन घेणारे शेतकरी ५३८ किंवा ६३९अशा पद्धतीने लागवड करतात. बी किंवा वेल रोपे लागवडीपासून उत्पादन घेण्यात येते. काळी मध्यम भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन यास आवश्यक असते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत वापरण्यात येते. लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांत पहिली खुडणी करण्यात येते. एकंदरित जातीनुसार सुमारे १०० ते १२५ क्र ेट खुडणी दर दोन दिवसांनी होते. एका क्र ेटमध्ये १६ ते १८ भोपळे बसतात. एक फूट लांबीच्या भोपळ्यांच्या एका क्रेटला प्रतवारी व दर्जानुसार १५० ते २०० रु पये असा भाव सध्या मिळतो आहे. एकरी खर्च अंदाजे ३० हजार रु पये लागवड ते उत्पादन घेण्यापर्यंत येतो. ४ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत उत्पादन मिळते. तर उत्पादनाच्या उत्तरार्धापर्यंत अंदाजे एक ते दीड लाख रु पये उत्पन्न मिळते. भावाच्या चढ-उतारावर उत्पन्नाची आकडेवारी अवलंबून असते. भोपळ्याच्या वेलीला प्रत्येक शेंडा मारावा लागतो तद्नंतर कळी उमलते व त्याचे रूपांतर फळात होते. भुरी, नागअळी, किडीचा प्रादुर्भाव डाउनी, भुरी, नागअळी या रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव भोपळ्यावर होतो. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड व कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भोपळ्याचे उत्पादन घेतले जाते. दर दोन दिवसांनी खुडणी करणाऱ्या भोपळ्यापासून मिळणारे उत्पन्न खात्रीशीर असून, विविध आयुर्वेद आचार्यांनी हृदयविकारावर भोपळ्याचा रस व तत्सम आजारावर प्रभावी व रामबाण उपायासाठी भोपळा उपयुक्त असल्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे स्वाभाविक भोपळ्याला मागणी वाढली आहे.