बेलगाव कुऱ्हे : अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला शेतात राब राब राबूनदेखील टमाट्याला योग्य भाव नसल्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात या संकटामुळे शेतकरी हतबल झाले असून, निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करीत काही दिवसांपूर्वी परजिल्ह्यातून काही मेंढपाळांचे स्थलांतर भरवीर बुद्रुक परिसरात झाले आहे. चाऱ्यासाठी मेंढपाळांची मोठी आबाळ झाली असताना टमाट्याला कवडीमोल बाजारभाव असल्याने मोठा फटका बसला असून, रोपेही पूर्णपणे करपून गेली आहेत. अशातच कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आलेल्या परिस्थितीचा सामना करीत भरवीर बुद्रुक ता. इगतपुरी येथील शेतकरी जनार्दन भांगरे यांनी माणुसकी दाखवित नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या मेंढ्यांना शेतीत सोडून दिलेले टमाटे व रोपांचा पाहुणचार दिला आहे. अतिथी देवो भवो या उक्तीप्रमाणे प्राणिमात्राची दया अंगी येत हिरव्या चाऱ्याचा पाहुणचार त्यांना दिल्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळ बांधवांनी त्यांचे मनापासून आभार मानले.गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरातील घसरण सुरू असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या मिळत असलेल्या दरात वाहतूक खर्चही भागत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक आहे त्या स्थितीत सोडून द्यावे लागत आहे. यामुळे लाखो रु पयांचे नुकसान सहन करून त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे
मेंढ्यांना टमाटा रोपांचा पाहुणचार
By admin | Updated: February 9, 2017 23:00 IST