शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येस बॅँकेच्या शाखेत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:28 IST

कळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकळवण : खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नाराजी

ग्राहकांना देण्यात आलेले टोकण.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे.खेडगाव येथील सेवानिवृत्त सैनिक सुरेश पगारे यांनी निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे मानूर, ता. कळवण येथील येस बँकेच्या शाखेत ठेवले आहेत. शनिवारी सकाळी शेतमजुरांना कामाचा मोबदला देण्यासाठी ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता मशीनमधून पैसे आले नाही. त्यांनी थेट बँक गाठून बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांना चेक आणला आहे का, अशी विचारणा झाली. त्यांनी घरी धाव घेत धनादेश नेला व बॅँक कर्मचाºयाकडे दिला. धनादेश देऊनही रोकड मिळाली नाही. रोकडऐवजी टोकन देण्यात आले आहे.शाखेत पैसे नसल्याने ज्यावेळी रोकड येईल त्यावेळी तुम्हाला बोलावू असे बॅँकेकडून सांगण्यात आले. बॅँकेकडे अधिक चौकशी केली असता ठेवीदारांना ५० हजारांपर्यंत रोकड दिली जात असल्याची खोटी माहिती देण्यात आली. बॅँक कर्मचारी खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे देत असून, खातेदार मेटाकुटीस आले आहेत. सेवा पूर्णपणे खंडितरिझर्व्ह बँकेने येस बॅँकेवर निर्बंध घातल्याने खातेदार आणि ठेवीदारांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरू आहे. बँकेचे नेट बँकिंग, मोबाइल अ‍ॅप, डेबिट आणिक्र ेडिट कार्ड, चेक क्लिअरिंग आदी सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आल्या आहेत.हे कमी म्हणून गूगल पे, फोन पे सारखी इतर मोबाइल वॉलेट्समधून येस बँकेच्या खातेदारांना व्यवहार करता येत नसल्याने खातेदारांची पुरती कोंडी झाली आहे.सकाळी पैसे काढण्यासाठी गेलो असता एटीएममधून पैसे आले नाहीत. बँकेत गेल्यानंतर रोकड नसल्याचे सांगत, टोकन देण्यात आले. रोकड आल्यानंतर बोलवण्यात येईल, असे सांगण्यात आले.- सुरेश पगारे, खातेदार

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYes Bankयेस बँक