शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची ‘टॉयलेट : एक फेककथा !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:31 IST

: शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृह नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांच्या मदतीने मोफत प्रसाधनगृह योजना राबविण्याचा गाजावाजा महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी करण्यात आला.

नाशिक : शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृह नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांच्या मदतीने मोफत प्रसाधनगृह योजना राबविण्याचा गाजावाजा महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ही योजना पुढे गेलीच नाही आणि करार तर बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.  महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महिलांसाठी ही योजना आखली होती. महापालिकेने मुळातच १९९८-९९ मध्ये अनेक अतिक्रमणे हटविताना रस्त्यालगत असलेची महापालिकेची सार्वजनिक प्रसाधनगृहेही हटविली त्यामुळे शहराच्या बहुतांशी भागात अशाप्रकारे सार्वजनिक प्रसाधनगृहे नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या महिला आघाडीने राइट टू पी अंतर्गत चळवळ सुरू केली होती. नंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजनेअंतर्गत महापालिकेने शौचालये आणि प्रसाधनगृह बांधण्याची तयारी केली, मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने खासगी हॉटेल्सचालक आणि पेट्रोलपंपचालकांची मदत घेऊन तेथेच महिलांसाठी मोफत प्रसाधनगृह व शौचालयाचा वापर करण्याची योजना होती. हैदराबाद आणि दिल्लीत याप्रकाराची योजना असल्याने त्याच धर्तीवर हॉटेल्स आणि पेट्रोल पंपावर खासगी शौचालये आणि प्रसाधनगृह महिलांना मोफत सुविधा आहे. त्याच धर्तीवर योजना आखताना हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांशी करार करण्यात येऊन या योजनेला काहीसे वैधानिक स्वरूप दिले जाणार होते. मात्र पुढे योजना गेलीच नाही. महापालिका आणि संबंधित व्यावसायिकांनी त्याचा नाद सोडून दिला आणि त्यामुळेच योजना गुंडाळली गेली आहे.  या योजनेसाठी पेट्रोलपंपचालकांनी विरोध केला होता. मात्र, महापालिकेने हॉटेलचालकांसाठी स्टिकर्सही तयार केले होते, असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात मात्र असे स्टिकर्सही कोणत्या हॉटेल्सवर दिसले नाही. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी अशाप्रकारची टूम काढण्यात आली होती. नंतर मात्र महापालिकेने योजनेला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाजावाजा केलेली ही योजना प्रत्यक्षात अमलात आलीच नसल्याचे वृत्त आहे.अ‍ॅक्टनुसार नोंदणी नाही...मनपाने कितीही गाजावाजा केला असला तरी मूळ ब्रिटिशकालीन सराय अ‍ॅक्टनुसार १८९३ मध्येच अशाप्रकारची तरतूद आहेच, परंतु नाशिकसह राज्यातील बहुतांशी हॉटेल या व्यावसायिकांची या अ‍ॅक्टनुसार नोंदणी नसल्याने या योजनेचे नावीन्य वाटत असले तरी प्रत्यक्षात नवीन काहीच नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका