मनमाड : शहर व परिसरात सोनपावलांनी आगमन झालेल्या जेष्ठा कनिष्ठा गौरींचे उद्या शुक्रवारी जेष्ठा नक्षत्रावर मंगलमय वातावरणात पुजन होत आहे.गणेशोत्सवाच्या आनंदात भर टाकनाऱ्या गौरींचे आज अनुराधा नक्षत्रावर आगमन झाले.दिवसभर गौरींची विधीवत स्थापना करण्याचा मुहूर्त होता. ‘महालक्ष्मी कशाच्या पावला वर .. सोन्याच्या पावलावर ’! अशा जयघोषात जेष्ठा कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले आहे. उद्या पुजना निमीत्त पुरणपोळी व सोळा भाज्यांचा नैवेद्द दाखवण्यात येतो.काही घरांमधे गौरींसमोर करंज्या व साठोऱ्यांचा फुलोरा बांधन्यात येतो.जेष्ठा कनिष्ठा गौरींच्या समोर बाळाची स्थापना करण्यात येते. आकर्षक आरास सजावट व रोषनाइ करन्यामधे घराघरामधे चढाओढ सुरु असते. काही घरांमधे मुखवटयांची स्थापना करण्यात येते तर अनेक घरांमधे उभ्या गौरींची स्थापना करण्यात येते. सायंकाळी महिलांसाठी हळदि कुंकवाचे आयोजन करण्यात येते. शनिवारी गौरींचे विसर्जन होणार आहे. विसर्जना साठी सकाळी ६.५१ मिनिटांनंतरचा मुहुर्त आहे. (वार्ताहर)
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे आज पूजन
By admin | Updated: September 9, 2016 00:57 IST