शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:43 IST

नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून, गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.

नाशिक : नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून, गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळ्या काढण्यात येणार असून, शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी गुलाबपुष्प देऊन, काही ठिकाणी खाऊ देऊन तर काही ठिकाणी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळांनी पुस्तकवाटपासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असून, काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्याचे नियोजन केले आहे. काही शाळांमध्ये पताका लावून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी पालकांबरोबर शाळेमध्ये येताना दिसून येणार असताना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ स्वत: शिक्षक फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाºया बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचे रडणे-ओरडणे होऊ नये त्यासाठी काही शिक्षक खाऊ घेऊन उभे असलेले दिसून येतील. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शाळेत सोडायला येतील. त्यातच पहिल्यांदाच शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांची पावले गेटजवळच घुटमळणार असल्याने शहरातील जवळपास सर्वच शाळांचा परिसर आज गजबजून जाणार आहे.नवे पुस्तक, नवा गणवेश, नवी शाळा आणि नवे सवंगडी असे सारे काही नवे नवे सोबत घेऊन नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे. शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचेदेखील वाटप होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी