शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:00 IST

नाशिक : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि. १५) सकाळी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट होणार असून, सुमारे दीड हजार चिमुकले शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे.

ठळक मुद्देशाळा सज्ज : नवागतांच्या स्वागताची तयारी; शाळांच्या आवारात पुन्हा होणार किलबिलाट

नाशिक : शालेय सुट्या संपून जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, शुक्रवारी (दि. १५) सकाळी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची विद्यार्थी आणि पालकांनादेखील उत्सुकता आहे. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात किलबिलाट होणार असून, सुमारे दीड हजार चिमुकले शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून, शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा शुक्रवारी सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाºया चिमुकल्याचे स्वागत केले जाणार आहे. ग्रामीण भागात चिमुकल्यांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तर शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून मुलांच्या स्वागताची तयारी केली आहे.शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी शाळेचे रंगरूप पालटले आहे. असंख्य शाळा नव्या रंगात रंगल्या आहेत तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठीची सर्व तयारी शाळांनी केली असून पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचीदेखील आखणी केलेली आहे. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच मान्यताप्राप्त शाळा १५ तारखेला सुरू होणार आहेत. शहारातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्ताकांचे वाटप केले जाणार आहे.समायोजनामुळे गजबजणार शाळायंदा अनेक शाळांचे समायोजन करण्यात आल्याने शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढणार असून, पुरेशी शिक्षकसंख्यादेखील असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा यंदा बंद करून जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात एकूण सुमारे ७५ शाळांचे समायोजन करण्यात आल्याने ओस पडलेल्या शाळा गजबजणार आहेत.92महापालिकेच्या शाळा89शहरातील अनुदानित92शहरातील विनाअनुदानित1200माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा3331