शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:10 IST

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमोबिलिटी सेलची बैठक : वाहनतळासह विविध विषयांवर होणार निर्णय

नाशिक : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आॅनस्ट्रिट आणि आॅफस्ट्रिट पार्किंग तयार करण्याचा निर्णय होणार असून, शहरात अवजड वाहनांना मनाई करण्याचा प्रस्तावदेखील मांडण्यात आला आहे.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ही बैठक महापालिकेच्या मुख्यालयात बोलावली आहे या मोबिलिटी सेलमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबरच पोलीस अधिकारी, आरटीओ तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विविध मार्गांवर आणि चौकात होणाºया वाहतूक कोंडीबरोबर शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहने उभी करावीत हा प्रश्न असतो, त्यातच रस्त्यात कुठेही वाहने उभी केली तर पोलिसांच्या वतीने वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे शहरात आॅनस्ट्रिट आणि आॅफस्ट्रिट पार्किंग सुरू करण्यासाठी प्रस्ताव आहे. त्यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत ३३ ठिकाणी ई-पार्किंगचे नियोजन आहे. परंतु अनेक भागात अशाप्रकारे ई-पार्किंगदेखील नाही बाजारपेठांमध्ये ही अडचण जाणवत असते, त्या पार्श्वभूमीवर वाहनतळ उभारणीचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार आहे .त्यातील सर्वांत महत्त्वाचे पहिल्या टप्प्यातील काम रामवाडी पूल ते होळकर पूल यादरम्यान होणार आहे. या कामामुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्याबाबतदेखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रोजेक्ट् गोदा अंतर्गत सध्या रामकुंडाजवळ असलेले वाहनतळ टाळकुटे मंदिराजवळ स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या वाहतूक बेटांचे तसेच दुभाजकांची सुशोभीकरण याबाबतदेखील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.पाच ठिकाणी सिग्नलशहरात पाच ठिकाणी तातडीने सिग्नल उभारण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बीवायके कॉलेजजवळील टी. ए.कुलकर्णी चौक, सातपूर येथील पपया नर्सरी, नाशिकरोड येथील विहितगाव चौक, गोविंदनगर येथे कर्मयोगी चौक, शरणपूररोडवरील एचडीएफसी बँक आशा पाच ठिकाणी सिग्नल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास४नाशिक शहरात ज्या ज्या ठिकाणी सतत अपघात होतात अशा अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याचे शासनाचे आदेश असून, त्यावरदेखील बैठकीत निर्णय होणे शक्य आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी