शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

जिल्ह्यात आज ठरणार गावचा प्रथम नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:07 IST

जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींना गावचा प्रथम नागरिक लाभणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव हे चार तालुकेवगळता उर्वरित ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.

नाशिक : जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींना गावचा प्रथम नागरिक लाभणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव हे चार तालुकेवगळता उर्वरित ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार असून, याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी काढले आहेत. यंदा सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षणापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट असल्याने केवळ औपचारिकता राहिली आहे.सरपंचपदाच्या बोलीप्रकरणी निवडणूक आयोगाने यापूर्वीच देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरविली. आता निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव या चार तालुक्यांमधील सरपंचपदाच्या निवडीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव स्थगितसरपंचपदाचे आरक्षण काढताना तहसीलदारांकडून नियम आणि निकषांचा भंग करण्यात आल्याचा आक्षेप घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. संवर्गनिहाय आरक्षण आणि लोकसंख्येच्या तुलनेतील तफावत व त्यानुसार प्रवर्गामध्ये तफावत असल्याची पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने निफाड, सिन्नर, चांदवड या तीन तालुक्यांतील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आलेली आहे. आता याच कारणास्तव नांदगाव तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींनादेखील स्थगिती मिळालेली आहे. निफाड तालुक्यातील ६५, सिन्नर तालुक्यातील १०० तर चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना आता स्थगिती मिळाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElectionनिवडणूक