नाशिक : गंगापूर धरण येथील पाणी उपसा करण्याच्या ठिकाणी महावितरण विभागाला अत्यावश्यक काम करायचे असल्याने शनिवारी (दि.४) दुपारनंतर संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.महावितरणला ३३ केव्ही ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करायची असल्याने सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा केला जाणार नसल्याने पाणीपुरवठाच होऊ शकणार नाही. काम निर्धारित वेळेअगोदर आटोपल्यास पुरवठा सुरळीत होऊ शकतो. रविवारी (दि.५) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.
आज सायंकाळी पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:46 IST