शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आज विजयादशमी ; नवरात्रीच्या उपवासांची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:37 IST

आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत.

नाशिक : आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१७) रात्री उशिरापर्यंत नाशिककरांची खरेदी व तयारीची लगबग पहायला मिळाली. शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची विक्री झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या मुहूर्तावर सोने, चांदी, हिरे, मोती, गृहोपयोगी साहित्य, वाहन, सदनिका आदींची खरेदीही होणार असल्याने बाजारात विविध आकर्षक आॅफर्सची धूम पहायला मिळत आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेसलेला आहे. नवरात्रोत्सवातील उपवासांची सांगता नैवेद्य दाखवून होणार असून, नैवेद्यासाठी श्रीखंड, गुलाबजाम, अंगुरमलाई आदी मिठाईखरेदीसाठी दुकानांवर गर्दी पहायला मिळाली.अष्टमीनिमित्त उपवास, देवदर्शन, चक्रपूजा, दसºयाची तयारी यांची लगबग पहायला मिळाली. ज्यांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसते, असे भक्त अष्टमीला उपवास करतात. काही ठिकाणी अष्टमीला फुलोरा तयार करण्याची परंपराही आहे. त्याचीही लगबग बघायला मिळाली.

टॅग्स :DasaraदसराNavratriनवरात्री