शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आज आरटीईटी तिसरी सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:15 IST

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे पालकांना एसएमएस पाठविले जाणार नाहीत.

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे पालकांना एसएमएस पाठविले जाणार नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पालकांना फोन करून माहिती द्यावी तसेच शाळेच्या नोटीस बोर्डवर यादी प्रदर्शित करावी अशा सूचाना शिक्षण विभागाने केल्या आहे. वेबसाइटच्या होमपेजवरही अर्जाचा क्रमांक टाकून विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती मिळविता येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.  आरटीईच्या २५ टक्के राखीव प्रवेशासाठी जिल्हा परिषद कार्यालयात तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी व मनपाचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शाळा मुख्याध्यापकांनाही त्यांच्या लॉगइनवर यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक मनपा क्षेत्रासाठी पोलीस मुख्यालय परिसरातील शाळा क्रमांक १६ मध्येही निवड यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरटीई अंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये तीन हजार ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून आरटीईच्या तीन हजार २०२ जागांसाठी बुधवारी (दि. १३) तिसरी सोडत काढली जाणार आहे.तिस-या फेरीसाठी ३ हजार २०२ जागाया सोडतीपूर्वी प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली असून, या संधीचा ७०३ विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे आता आरटीईसाठी एकूण ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी प्रथम फेरीत निवड झालेल्या ३००१ विद्यार्थ्यांपैकी २१८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर दुसºया फेरीत निवड झालेल्या १९०२ विद्यार्थ्यांपैकी ११९८ प्रवेश पूर्ण  झाले असून, आतापर्यंत निवड झालेल्या ४ हजार ९०३ जागांपैकी ३ हजार ३८२ जागांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसºया फेरीसाठी ३ हजार २०२ जागा उपलब्ध असून, त्यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून बुधवारी सोडत काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा