शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आज धार्मिक स्थळे हटविण्याबाबत सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:19 IST

शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.४) सुनावणी होणार असून, त्याकडे शहराचे लक्ष लागून आहे. महापालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नाशिक : शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.४) सुनावणी होणार असून, त्याकडे शहराचे लक्ष लागून आहे. महापालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.  उच्च न्यायालयाने राज्यातील बेकायदेशीररीत्या बांधलेली बेकायदेशीर बांधकामे हटविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी महापालिकेने काही धार्मिक स्थळे हटविली होती. आता अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका पुन्हा मोहीम हाती घेणार असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात ३१ आॅगस्टच्या आत २००९ नंतरची धार्मिक स्थळे हटवण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.  परंतु तत्पूर्वीच मठ मंदिर समितीने बैठक घेतली आणि त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून, ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर महापालिकेने अद्याप कार्यवाही केलेली नाही.उच्च न्यायालयात विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या याचिकेत महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारे मंदिर समिती गठीत केली नाही तसेच हरकती व सूचना मागवल्या नाहीत, अशी तक्रार आहे.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक